
जळगाव पोलिसांचा देशात अन राज्यात डंका! २६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाची पोलीस पदके
दीर्घकालीन अन् निष्कलंक सेवेची शासनाकडून पावती; पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
जळगाव प्रतिनिधी
अहोरात्र धावपळ, कायदा आणि सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी अन् नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर… जळगाव पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या याच प्रामाणिक अन् निष्कलंक सेवेचा १४ ऑगस्ट रोजी शासनाकडून मोठा गौरव करण्यात आला. जळगाव पोलीस दलातील तब्बल २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील पोलीस पदके जाहीर झाली असून, या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गुन्हेगारीवर वचक बसवणे असो की जनसेवेची बांधिलकी जपणे, या सर्वच आघाड्यांवर या शिलेदारांनी बजावलेली कामगिरी अत्यंत आदर्शवत ठरली आहे.
उत्कृष्ट सेवा पदक मिळवणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश
या गौरवशाली यादीमध्ये श्रीकांत धिवरे (उत्कृष्ट सेवा पदक), विजयकुमार ठाकूरवाड (अति उत्कृष्ट सेवा पदक), नितीन गणापुरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), शशिकांत पाटील (विशेष सेवा पदक), दिनेश वडगुजर (पोलीस पदक), मुजफ्फरअली सय्यद (पोलीस पदक), श्रीकृष्ण पटवर्धन (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील दामोरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रविणा जाधव (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील माळी (अति उत्कृष्ट सेवा पदक), अनिल इंगळे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रदिप पाटील (अति उत्कृष्ट सेवा पदक), जमीन अहमदखान (अति उत्कृष्ट सेवा पदक), जयंत चौधरी (अति उत्कृष्ट सेवा पदक), हरिष कोळी (उत्कृष्ट सेवा पदक), दिपक पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), प्रविण वाघ (उत्कृष्ट सेवा पदक), विजय पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), शरद पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप सावळे (उत्कृष्ट सेवा पदक), महेश महाजन (उत्कृष्ट सेवा पदक), रज्जाकअली सय्यद (उत्कृष्ट सेवा पदक), भाऊसाहेब पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), अतुल चौधरी (उत्कृष्ट सेवा पदक) आणि ईश्वर पाटील (उत्कृष्ट सेवा पदक) या २६ समर्पित अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.
जळगाव पोलीस दलातर्फे या सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





