खान्देशगुन्हेजळगांव

कासोदा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई ; सात जुगारी अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कासोदा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई ; सात जुगारी अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एरंडोल (प्रतिनिधी ): कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करून सात जुगारींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी बांभोरी शिवारातील गालापुर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतालगत करण्यात आली.

सपोनि. निलेश राजपुत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाईसाठी पोना/४५६ अकिल मुजावर, पोकॉ/१७१८ समाधान तोंडे, पोकॉ/३६० प्रशांत पगारे, पोकॉ/६८२ कुणाल देवरे व पोकॉ/१९९७ योगेश पाटील या पथकाने छापा टाकला. छाप्यात आरोपी पैशावर पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले. संध्याकाळी साडेचार वाजता झालेल्या कारवाईत सात जुगारींना अटक करण्यात आली.

अटक आरोपी हे सर्व कासोदा येथीलच असून त्यांची नावे शेख फारुख शेख नबी, शेख शहीद शेख रफिक, शेख निजाम शेख सिराज, तस्लीम सुलेमान खान, शेख हमीद शेख शौकत, शेख हमीद शेख अमीर व शेख मुस्ताक खान अमीर खान अशी आहेत.

पोलिसांनी या कारवाईतून एकूण ₹१,६६,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रोख ₹३,३८०, मोबाईल ₹२२,००० व तीन मोटारसायकल ₹१,४०,००० चा समावेश आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button