
कुत्र्याच्या दफनविधीस विरोध केल्याने एकाला मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागात कुत्र्याच्या दफनविधीस विरोध केल्याने एका नागरिकाला मारहाण झाल्याचा प्रकार बुधवारी (७ मे) दुपारी १२.३० वाजता घडला. या प्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील एका दफनभूमीत कुत्र्याचा मृतदेह दफन करण्यासाठी शनिपेठ परिसरातील सनी पवार या युवकाने कुत्र्याचा मृतदेह आणला होता. मात्र, या ठिकाणी प्राण्याच्या मृतदेहावर दफनविधी करता येणार नाही, असे सांगत अकील अब्दुल्ला सय्यद (वय ५१) यांनी त्याला विरोध केला.
विरोधामुळे संतप्त झालेल्या सनी पवारने सय्यद यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर अकील सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सनी पवार याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.